HW News Marathi
Covid-19

चिंताजनक! बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल कडक लॉकडाऊन!

बीड | राज्यातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमिवर बीडमध्ये कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. २६ मार्च ते ४ एप्रिल कडक लॉकडाऊन जारी केला आहे. बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी अखेर जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. बीड जिल्ह्यात कलम १४४ अनुसार लॉकडाऊनचे आदेश लागू करण्यात येत आहेत.

काय आहेत निर्बंध?

  • सार्वजनिक खाजगी क्रिडांगणे मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपुर्णत बंद राहतील
  • तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning Walk व Evening Walk प्रतिबंधीत राहील
  • उपहारगृह, रेस्टॉरेंट, लॉज, हॉटेल्स, मॉल बाजार, मार्केट संपूर्णत बंद राहतील
  • सर्व केशक्तनालय/ सलून/व्यूटी पार्लर दुकाने संपूर्णत बंद राहतील.
  • शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णत बंद राहतील.
  • सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी बंद राहतील
  • तथापि अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकिय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर करता येईल.
  • सार्वजनिक व खाजगी बस सेवा,ट्रक,टेम्पो, ट्रेलर ट्रॅक्टर बंद राहतील
  • तथापि कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे बीड जिल्ह्यातील नगरपालिका/नगरपंचायत चे पोलीस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत.
  • तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी पुर्व परवानगी असलेले घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहेत
  • सर्व चित्रपट गृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणुक उद्योग, नाट्यगृह, प्रेक्षागृह संपूर्णत बंद राहतील
  • मंगल कार्यालय, हॉल, लान समारंभ स्वागत समारंभ संपूर्णत बंद राहतील
  • सामाजिक, राजकीय क्रिडा मनोरजन सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील
  • धार्मिक स्थळ/सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णत: बंद राहतील
  • सर्व किराणा दुकानाची ठोक विक्रेते सकाळी ७ ते ९ वाजेपर्वत सुरु राहतील किरकोळ विक्रेत्यांना या वेळेतच केवळ दुकानातून घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील
  • दुध विक्री व वितरण सकाळी १० वाजेपर्यंत घरपोच सुरु राहील तथापि दूध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल.
  • भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी ७ ते १० या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतील त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील किरकोळ विक्रेते एका ठिकाणी न थांबता मास्क लावून गल्लो गल्ली फिरुन सकाळी ७ ते १२ या वेळेतच विक्री करतील
  • सर्व न्यायालये व राज्य शासनाचे केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम स्थानिक संस्थेची कार्यालये राष्ट्रीयकृत बॅंका शासन निर्देशानुसार ५० टक्के उपस्थिती मर्यदिनुसार सुरु ठेवता येतील.
  • शक्य असल्यास Work From Home चा पर्याय वापरण्यात यावा शासकीय कर्मचा यासाठी आवश्यक पासची आवश्यकता राहणार नाही, तथापि स्वत:च ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे.
  • बीड शहरातील पोलीस पेट्रोल पंप, नगर रोड, बीड, साई पेट्रोल पप, बाशी रोड, बीड हा पेट्रोल पंप २४ तास चालू राहील तालुका मुख्यालयाच्या ठिकानी एक पेट्रोल पंप सुरू राहील.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyaRamMandir | राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे, रोहित पवारांची भावनिक साद

News Desk

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ५७ लाखांवर पोहोचली, तर अमेरिकेत कोरोनामुळे १ लाख लोकांचा मृत्यू

News Desk

राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला तातडीने द्या ! | नाना पटोले

News Desk