HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

कोल्हापुरात पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊन

कोल्हापूर | राज्यातील कोरोना परिस्थीतीचा आढावा घेत एक एक जिल्हा लॉकडाऊन करत आहे. सांगली नंतर आता कोल्हापूरातही लॉकडाऊन करण्याचा विचार करण्यात आला आहे. कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उद्यापासून (५ मे) पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी  पॉझिटिव्ह दर कमी नाही. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात आहे. त्यामुळे उद्या बुधवार दि. ५ मे सकाळी ११ वाजल्यापासून पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यानुसार १५ मेपर्यंत कोल्हापुरात लॉकडाऊन असणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्या ११ वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा, असे पालकमंत्री सतेज पाटील यावेळी म्हणाले. तर सर्वोच्च न्यायालयानेही लॉकडाऊनचा पर्याय सुचवला आहे. रूग्णसंख्या थांबविण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. पोलीसांनी त्याची अंमलबजावणी करावी, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे

Related posts

महापालिका उपायुक्त निधी चौधरींची महात्मा गांधींवरील वादग्रस्त ट्वीटनंतर सारवासारव

News Desk

#LetterToAmbedkar : मोहिमेनुसार मंत्री जयंत पाटील यांचे बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन !

News Desk

दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती

News Desk