HW News Marathi
Covid-19

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (११ मार्च) मुंबईतील जे.जे.रुग्णालयात कोरोना लस घेतली.यावेळी पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. लस घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरेंनी लोकांना लसीबद्दल कोणतीही भीती किंवा संभ्रम न बाळगण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाउनचा इशारा दिला आहे. येत्या एक दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.“कदाचित काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाउन करावा लागेल. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, बाहेर अनावश्यक गर्दी टाळा, विनाकारण बाहेर येणं-जाणं टाळा, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा”.

“कदाचित आपल्याला पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, पण ती जाऊ नये असं वाटत असेल तर ही बंधन पाळणं गरजेचं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. औरंगाबादमध्ये निर्बंध असतानाही लोक बाहेर फिरत असल्याचं सांगण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “काही ठिकाणी कडक लॉकडाउन करावा लागेल. येत्या एक दोन दिवसांत आम्ही निर्णय घेणार आहोत. गरज वाटेल तिथे लॉकडाउन करावा लागेल”, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजधानी दिल्लीत ६ दिवसांचा लॉकडाउन जाहीर!

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मांडलेले ‘हे’ मुद्दे

News Desk

बेड्सचे नियंत्रण एकाच छत्राखाली आणा : महापौर मुरलीधर मोहोळ

News Desk