HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर

परभणी | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे परभणीत स्थानिक प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यात दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज (१२ मार्च) मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे १३ आणि १४ मार्च हे दोन दिवस परभणी जिल्हा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. आज मध्यरात्रीपासून सुरु झालेला लॉकडाऊन सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत लागू असणार आहे.

परभणी हा पुन्हा लॉकडाऊन होणार राज्यातील दुसरा जिल्हा आहे. यापूर्वी नागपूरमध्ये सात दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे नागपूर जिल्हा १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. तसेच, पुण्यात लॉकडाऊन लागू केला नसला तरी रात्रीची संचारबंदी कायम ठेवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात एका दिवसात तब्बल ६,०८८ सर्वाधिक संख्या कोरोना रुग्णांची नोंद

News Desk

बीडमध्ये इंदुरीकर महाराजांच्या जाहीर किर्तनाला हजारोची गर्दी; कोरोना नियमांचे उल्लंघन

Aprna

#Coronavirus : जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर यशस्वी मात

News Desk