HW News Marathi
Covid-19

Murlidhar Mohol HW Exclusive : पुण्यातील लॉकडाऊन वाढवायला हवा !

पुणे। महाराष्ट्र कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन शहरात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी एच. डब्ल्यू. मराठीला खास मुलाखत दिली आहे. पुणे शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहात लॉकडाऊन वाढवा, असे मत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे.

पुण्यात आज (२८ एप्रिल) १२०० रुग्ण आढळून आले आहे. पुण्यात ज्याठिकाणी दाट लोकवस्ती म्हणजे जेथे झोपडपट्टी असेल अशा ठराविक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या जास्त आढळून आल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. आणि याठिकाणी महापालिका प्रशासन, पोलीस आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रेड झोन असलेल्या शहरात ३ मे नंतर लॉकडाऊन वाढवा का? या प्रश्नावर उत्तर देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. निश्चितच पण येत्या काळात रुग्णांचे प्रमाण खाली येईल. ३मेनंतरही पुणेमध्ये तरी लॉकडाऊन वाढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संपूर्ण मुलाखत

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांची कोरोनावर यशस्वी मात !

News Desk

जगात कोरोनाची लस घेणाऱ्या पहिल्या पुरुषाचा झाला मृत्यू

News Desk

महापौरांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मांडली पुण्यातील कोरोनास्थिती

Gauri Tilekar