HW News Marathi
Covid-19

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ हजार ३१८ वर पोहोचली

मुंबई । राज्यात आज कोरोनाच्या ७२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार ३१८ झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात ३१ रुग्णांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी २५ जण मुंबईचे तर पुण्यातील २ आणि जळगाव येथील प्रत्येकी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ४०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज १०६ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १ लाख २९ हजार ९३१ नमुन्यांपैकी १ लाख २० हजार १३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत १ हजार ३८८ कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय कोरोना बाधितांची संख्या

  • मुंबई – 6169 (मृत्यू 244)
  • ठाणे- 45 (मृत्यू 2 )
  • ठाणे महानगरपालिका- 344 (मृत्यू 4)
  • नवी मुंबई मनपा- 142(मृत्यू 3)
  • कल्याण डोंबिवली- 153 (मृत्यू 3)
  • उल्हासनगर मनपा – 3
  • भिवंडी – 14

    निजामपूर – 14

  • मिरा-भाईंदर- 123 (मृत्यू 2)
  • पालघर- 41 (मृत्यू 1 )
  • वसई- विरार- 123(मृत्यू 3)
  • रायगड- 22
  • पनवेल- 44 (मृत्यू 1)
  • नाशिक – 5
  • नाशिक मनपा- 19
  • मालेगाव मनपा – 171 (मृत्यू 12)
  • अहमदनगर- 26 (मृत्यू 2)
  • अहमदनगर मनपा – 16
  • धुळे – 8 (मृत्यू 2)
  • धुळे मनपा – 17 (मृत्यू 1)
  • जळगाव- 30 (मृत्यू 8)
  • जळगाव मनपा- 10 (मृत्यू 1)
  • नंदुरबार – 11 (मृत्यू 1)
  • पुणे- 58 (मृत्यू 3)
  • पुणे मनपा- 1044 (मृत्यू 76)
  • पिंपरी-चिंचवड मनपा- 72 (मृत्यू 3)
  • सातारा- 32 (मृत्यू 2)
  • सोलापूर- 7
  • सोलापूर मनपा- 75 (मृत्यू 5)
  • कोल्हापूर- 7
  • कोल्हापूर मनपा- 5
  • सांगली- 26
  • सांगली – 1

    मिरज – 1

    कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1)

  • सिंधुदुर्ग- 1
  • रत्नागिरी- 8 (मृत्यू 1)
  • औरंगाबाद -1
  • औरंगाबाद मनपा- 89 (मृत्यू 6)
  • जालना- 2
  • हिंगोली- 15
  • परभणी मनपा- 1
  • लातूर -12 (मृत्यू 1)
  • उस्मानाबाद-3
  • बीड – 1
  • नांदेड मनपा – 3
  • अकोला – 12 (मृत्यू 1)
  • अकोला मनपा- 22
  • अमरावती- 2
  • अमरावती मनपा- 26 (मृत्यू 7)
  • यवतमाळ- 71
  • बुलढाणा – 21 (मृत्यू 1)
  • वाशिम – 1
  • नागपूर- 4
  • नागपूर मनपा – 131 (मृत्यू 1)
  • भंडारा – 1
  • चंद्रपूर मनपा – 2
  • गोंदिया – 1
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्र सरकारमुळे देशाच्या कोरोनाविरोधी लढ्याला बसला फटका”, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फटकारलं

News Desk

‘शेती विकायची नसते ती राखायची असते‘ प्रविण तरडेंची शेतात भातलावणी !

Arati More

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, भाजपचा खटाटोप सुरू | जयंत पाटील

News Desk