HW News Marathi
Covid-19

साताऱ्यात १७ जुलै पासून पुन्हा लॉकडाऊन ! जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद राहणार?

सातारा | राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये की कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन केला जात आहे. सातारा जिल्ह्यात सध्या १८४५ बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे, असे सातारा जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह म्हणाले. त्यामुळे साताऱ्यात १७ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २६ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याचे आदेशही काढण्यात आले आहेत.

काय बंद? काय सुरू राहणार?

* किराणा दुकाने, किरकोळ विक्रेते, इतर व्यवसाय करणारे व्यापारी यांची दुकाने १७ जुलै रात्री १२ पासून ते २२ जुलै रात्री १२ पर्यंत बंद राहतील. २२ जुलै पासून २६ जुलैपर्यंत ही दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहतील. मात्र, या काळात केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने पूर्णपणे सुरू राहतील.

* रिसॉर्ट, मॉल, बाजार बंद राहतील.

* वाईन शॉप, देशी दारूची दुकाने, मद्याची घरपोच सेवा या बाबी १७ ते २२ जुलै पर्यंत पूर्णतः बंद राहतील.

* २२ ते २६ जुलै या कालावधीत केवळ घरपोच सेवा सुरू राहतील.

* रेस्टॉरंट, ऑनलाईन खाद्यपदार्थ यांची घरपोच सेवा १७ ते २२ जुलैपर्यंत पूर्ण बंद राहतील. २२-२६ जुलैपर्यंत पुन्हा घरपोच सेवा सुरू राहील.

* उद्याने, क्रीडांगणे बंद राहतील.

* मटण, चिकन यांची विक्री १७-२२ पूर्ण बंद राहील. २२-२६ सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत विक्री सुरू राहील.

* शाळा, महाविद्यालये पूर्ण बंद राहतील.

* स्पा, सलून बंद राहणार.

* खासगी बांधकाम बंद राहणार.
* धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम यांना मुभा दिली नाही.
* दूध विक्री आणि घरपोच दूध सेवा सकाळी ६ ते १० या वेळेत सुरू राहील.
* गॅस सेवा, रेशन दुकाने सुरू राहतील.
* मेडिकल, रुग्णालय, अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद

News Desk

“मोदींनी देशात योग्य नियोजन केलं असतं तर…”, बच्चू कडूंचे केंद्रावर टीकास्त्र

News Desk

महाविकासआघाडी सरकारच्या सहा महिन्याचा लेखा-जोखा

News Desk