HW News Marathi
Covid-19

“पुण्यात सध्या तरी लॉकडाऊन नाही”, अजित पवारांनी सांगितलं कारण

पुणे | राज्यात रोज कोरोना रुग्ण संख्या ५०-६० हजारांच्यामध्ये वाढत आहे. मुंबईत कोरोना रुग्ण कमी होत असल्याने सुप्रीम कोर्टानेही याचे कौतुक केले आहे. तसेच, मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर पुण्यात लॉकडाऊन लागणार की नाही यासंबंधी चर्चा सुरु असताना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. अजित पवारांनी आज (७ मे) पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवली होती. यावेळी पुण्यात कोरोना स्थिती आटोक्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच, तुर्तास तरी पुण्यात लॉकडाऊनची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.

काय म्हणाले अजित पवार?

“काही लोकप्रतनिधींनी लॉकडाऊनची करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. सकाळी काही दुकानं उघडी असतात. लोक वेगवेगळी कारणं देतात त्यामुळे पोलिसांची अडचण होते. पण आत्ता आहे तशाच पद्धतीने चालू ठेवून कडक निर्बंध करावेत अशा सूचना दिल्या आहेत. कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी करता आली तर निकाल चांगला मिळेल,” असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

“ग्रामीण भागात सध्या रुग्णसंख्या जास्त दिसत आहे. पुण्यात रुग्ण थोडे कमी झाले आहेत. हायकोर्टाने सरकारला पुण्यात कडक लॉकडाउन केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. मला त्यासंदर्भात बोलायचं नाही,” सांगत अजित पवारांनी भाष्य करण्यास नकार दिला. हायकोर्टाच्या सूचनेसंबंधी राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं ते म्हणाले.

दुसऱ्या लाटेत जी धावपळ करावी लागली ती वेळ तिसऱ्या लाटेत येऊ नये यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा उभ्या करण्याची गरज आहे ते हातात घेतलं आहे अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. फायर ऑडिट तसंच ऑक्सिजनचं ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जे बारकावे लक्षात आले त्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

अदर पूनावालांशी चर्चा करणार, अजित पवारांचे आश्वासन

“१८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस देण्याचं सरकारच्या वतीने ठरलं होतं. पुरवठा कमी असल्याने अडचण निर्माण होत आहे. लस देणाऱ्यांना आणि नागरिकांनाही त्रास होत आहे. मी येथे आल्यावर अदर पूनावाला यांना फोन लावला. अजून १० ते १२ दिवस ते परदेशात असतील असं सांगण्यात आलं आहे. तेथील क्रमांक मिळवू संपर्क सागंण्याचा प्रयत्न असेल,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

लस पुरवठ्यावरुन अजित पवारांची पुन्हा नाराजी

“४५ वरील वयोगतील नगरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस मिळण्यास उशीर होत असल्याने काही नागरिकांमध्ये अस्वस्थात निर्माण झाली आहे. यासंबंधी आम्ही केंद्र सरकारशी बोलणार आहोत. मुंबईला गेल्यानंतर मी सर्वांशी बोलणार असून दुसरा डोस वेळेत देण्याची गरज आहे त्याबद्दल चर्चा करणार आहे. विलंब होऊ नये यासाठी विचार करत आहोत,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

बाकीच्या वयोगटातील लोकांना लस देण्यासाठी परदेशातील लसींना परवानगी दिली पाहिजे. सर्वांसाठी एकच दर असावा, आम्ही अदर पूनावाला यांच्याशी चर्चा करु असंही अजित पवार यांनी सांगितलं. आपलं लसीकरण करण्याआधीच दुसऱ्या देशांना पाठवली हा चुकीचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला असा संतापही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

बारातमीमधील लॉकडाऊनवरही अजित पवारांनी केले भाष्य

“जिथं संख्या वाढली आहे तेथील परिस्थिती पाहून लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. बारामतीमधील अधिकाऱ्यांनी मिळून निर्णय घेतला. मला अधिकाऱ्यानी कळवलं होतं. त्यावर मी होकार दिला,” असं अजित पवारांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या। उदय सामंत

News Desk

परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाला असून तो पुढेही कोरोनामुक्तच राहिल -नवाब मलिक

News Desk

पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण विधानसभेच्या अध्यक्ष पदाची ऑफर स्वीकारणार का?

News Desk