HW News Marathi
Covid-19

राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढला लॉकडाऊन

मुंबई ।राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत वाढला लॉकडाऊन राज्यातील नियंत्रणात आलेला कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ होऊ लागल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. दरम्यान, हा लॉकडाऊन राज्यातील कंटेन्मेंट झोनसाठी असणार आहे. एकीकडे मिशन बिगेनच्या अंतर्गत राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे कंटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध लागू आहेत.

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील नागरिकांनी सर्व नियम-निर्बंध पाळणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का ? अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. राज्यात पुन्हा वाढलेला कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळे सरकार हा निर्णय घेण्याची वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारच्या सूचनांनुसार, देशातील कोणत्याही राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात लॉकडाऊन लागू करायचा असेल तर राज्य सरकारांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार आहे, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या । राजेश टोपे

News Desk

‘माझी मैत्रीण लवकर बरी व्हावी’ चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकरांसाठी केली प्रार्थना !

Arati More

…नमस्कार, मी धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून बोलतोय !

News Desk