मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्याही २००० वर पार गेला आहे. देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यांची संख्या आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (११ एप्रिल) महाराष्ट्राचा लॉकडाऊनचा कालावधी पुढील दोन आठवड्यांसाठी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना परिस्थिती पाहून काही ठिकाणी हे लॉकडाऊन अधिक कडक केले जाईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत राज्यातील लॉकडाऊन वाढविल्यासंदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे.
🚨
The State Government hereby directs the lock-down orders issued vide notification dated 25th March 2020 shall now be extended upto and inclusive of 30th April 2020. pic.twitter.com/jIf10Pgk7a
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2020
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भात त्यांच्या ट्वीट हँडलवरून अधिसूचनाद्वारे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे ऑर्डर दिली आहे. या अधिसूचनेनुसार राज्यात २५ मार्चपासून ते ३० एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊनचा कालावधी जाहीर करण्ययात आल्या आहे. राज्यातील लॉकडाऊन काळात शेती, शेतीसंबंधीची कामे, शेतमाल वाहतूक, जीवनावश्यक वस्तुंची उपलब्धता, औषधे यांची वाहतूक आणि पुरवठा सुरुच राहतील, हेही याधी राज्यातील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी साथीरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ या काद्यातील तरतुदींची अंबलबजावणी राज्यात ३० एप्रिलपर्यंत वाढवलेल्या लॉकडाऊमध्ये करण्यात येणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.