HW Marathi
महाराष्ट्र

#LokSabhaElections2019 : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार

नवी दिल्ली | देशातील १७ व्या लोकसभा निवडणुकीचे आज (१० मार्च) बिगुल वाजले आहे. देशातील २९ राज्यात एकूण ७ टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार असून २३ मे रोजी निकाल लागणार आहे.  महाराष्ट्रात ४ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निडवणुका होणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी निवडणुका लढविल्या जातात. राज्यात ८ कोटी ७३ लाख मतदार असल्याचे आयोगाने सांगितले आहे.

राज्यात २५ मार्च ही निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याची माहिती राज्या निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. सात दिवसात उमेदवरांनी लोकसभा निवडणुकांचे अर्ज भरण्यास सुरुवात करावी असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

महाराष्ट्रात ११ एप्रिलमध्ये ७ जागांसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. १९ मे रोजी अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. १७ व्या लोकसभा निवडणूक ही ३९ दिवसांत आटोपणार आहे. तसेच १६ व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यकाळ ३ जूनला संपणार आहे.

१८ एप्रिल रोजी १० जागांसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. तर २३ एप्रिल रोजी १४ जागांसाठी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. आणि २९ एप्रिल रोजी  १७ जागांसाठी चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

महाराष्ट्रात ‘या’ चार टप्प्यात लोकसभा निवडणुका 

 

  • महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात (११ एप्रिल)  ७ जागांवर मतदान
  • दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) १० जागांवर मतदान
  • तिसऱ्या टप्प्यात (२३ एप्रिल) १४ जागांवर मतदान
  • चौथ्या टप्प्यात (२९ एप्रिल)  १७ जागांवर मतदान

 

Related posts

आनंद महिंद्रांनी मागितली कर्मचाऱ्याची माफी

News Desk

सत्ताधारी असूनही शिवसेना विरोधकांसारखी आंदोलनाची भाषा करते !

News Desk

लोकाभिमुख प्रशासनाद्वारे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार –  जिल्हाधिकारी डोंगरे                          

News Desk