मुंबई | शिवसैनिकांनी मारहाण केल्याप्रकरणी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी आज (१५ सप्टेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांकडे राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते अतुल भातखळकरदेखील महाराष्ट्र सरकारने माफी मागितली पाहिजे असेही शर्मा म्हणाले आहेत.
“मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर अधिक कठोर कलमं लावावी अशी मागणी केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई करु असे आश्वासन दिले आहे”. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,“मारहाण करताना शिवसैनिक आपण आरएसएस आणि भाजपचा चमचा असल्याचा उल्लेख करत होते. आपण माजी नौदल अधिकारी असून कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. माझ्याबद्दल त्यांच्या मनात कोणी गैरसमज पसरवला आहे याची माहिती नाही. तसेच, मी आरएसएस आणि भाजप यांना पाठिंबा देत आहे, ”असेही त्यांनी म्हटले आहे .
From now on, I am with BJP-RSS. When I was beaten up, they had levelled allegations that I'm with BJP-RSS. So now I announce, that I am with BJP-RSS today onward: Madan Sharma, retired Navy officer who was beaten up allegedly by Shiv Sena workers in Mumbai, after meeting Governor pic.twitter.com/Z5SJ13X4NF
— ANI (@ANI) September 15, 2020
अतुल भातखळकर यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली. तसेच, मारहाणीचे समर्थन करणाऱ्या अनिल परब यांनी मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही अशी टीका केली आहे. त्यामूळे आता राज्यपाल काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.