HW News Marathi
Covid-19

महाविकास आघाडी सरकार मिनिमम कॉमन हिंदुत्वावर ! ‘मनसे’चा टोला

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदुत्त्वाची आठवण करून दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात याच पार्श्वभूमीवर सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या वादात उडी घेतली आहे. “महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यावेळेस मिनिमम काँमन प्रोग्रॅम ठरला होता. मात्र, हे सरकार मिनिमम कॉमन हिंदुत्वावर गेले आहे”, अशी टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजप प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजपकडून आज (१३ ऑक्टोबर) राज्यव्यापी आंदोलन देखील करण्यात आले होते. याच विषयी राज्यपालांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत त्यांच्या हिंदुत्त्वावर प्रश्न उपस्थित केल्याने मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी खरमरीत शब्दांत उत्तर दिले. यामुळे,मुख्यतः शिवसेना भाजपमधील वाद पेटलेला असतानाच मनसेने देखील आता मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

“राज्यात मॉल उघडले जातात मग मंदिरं का बंद ठेवली जातात ?” असा सवाल उपस्थित करत “कोरोनासारख्या संकटाच्या काळात देवाचा आधार असतो. यामुळे मंदिर उघडली गेली पाहिजेत”, अशी मागणी संदीप देशपांडेंनी केली आहे. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळ मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आले होते.त्यानंतर राज ठाकरेंनी देखील मंदिरे उघडण्याची मागणी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपला जडला महाराष्ट्राचा अवमान करण्याचा रोग !

News Desk

उद्धव ठाकरे-शरद पवार यांची महापौर बंगल्यावर भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk

राज्य सरकारकडून ‘अनलॉक १’साठी तीन टप्प्यात निर्बंध हटवण्यास सुरुवात होणार

News Desk