अलिबाग | २४ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास महाड येथील ५ मजली तारीक गार्डन इमारत ही पत्यांसारखी कोसळली. या दुर्घटनेतील मदत व बचाव कार्यासाठी तातडीने NDRF चे जवान आणि तेथील रहिवासी घटनास्थळी पोहोचले. तब्बल ४० तासांनी हे बचाव कार्य पुर्ण झाले आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून यात ७ पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्यातून ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. ज्या लोकांना या दुर्घटनेत जीव वाचाल त्या ५ पुरुष, ३ महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
Maharashtra: Death toll rises to 16 (7 males and 9 females) in the building collapse incident in Raigad. Rescue operation is underway.
— ANI (@ANI) August 26, 2020
या तारीक गार्डन इमारतीत २५ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. दुर्घटना घडताच स्थानिक बचाव पथके आणि NDRF यांनी मदत व बचाव कार्य सुरु केले. सलग ४० तास हे मदत व बचाव कार्य सुरु होते. सर्व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळावर तळ ठोकून होत्या. दरम्यान,२४ ऑगस्टलाच ८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता. दुपारी १२ वाजता पहिला मृतदेह आढळून आला. नंतर एक एक करत १४ मृतदेह हाती लागले. दरम्यान, यात एका लहान मुलालाही सुखरुप वाचवण्यात आले. आज (२६ ऑगस्ट) सकाळी १० वाजेपर्यंत दोन बेपत्ता व्यक्तीचे मृतदेह NDRF च्या जवानांनी ढिगाऱ्या खालून बाहेर काढले. यानंतर हे मदत व बचाव कार्य थांबवण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.