HW News Marathi
महाराष्ट्र

चांगल्या निर्णयालाही शिवसेनेच्या मंत्र्यांचा खोडा – संभाजी पाटील-निलंगेकर यांचा आरोप

 

‘संजय राऊत शिवसेनेतील शकुनी मामा, पवारांच्या सल्ल्याने वागतात’ – संभाजी पाटील

उस्मानाबाद – मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगल्या निर्णयालाही शिवसेनेचे मंत्री अडथळा आणून खोडा घालत आहेत. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दिल्लीत बसून शरद पवारांच्या सल्ल्याने शकुनी मामाची भूमिका पार पाडत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे कामगारमंत्री आणि भाजप नेते संभाजी पाटील – निलंगेकर यांनी केला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगला निर्णय होत असेल तरीही शिवसेनेचे मंत्री त्यामध्ये अडथळा आणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आणि भाजप यांची युती हवी होती. मात्र, दिल्लीत काही जण पवारांच्या अवतीभवती बसून राजकारण शिजवतात. व्यक्तीच्या लाभासाठी या लोकांनी युतीमध्ये विष कालवण्याचे काम केले आहे, अशी टीका निलंगेकरांनी केली. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कार्यक्रमात भाजपशी युती तोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढल्यास भाजपने आमच्याकडे चर्चेला यावे, असे सूचक विधान केले होते. मात्र, आम्ही न मागताही शरद पवार पाठिंबा देऊन भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाटील -निलंगेकर यांनी सांगितले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दिल्लीत बसून शरद पवारांच्या सल्ल्याने शकुनी मामाची भूमिका पार पाडत आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. ते उस्मानाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी निलंगेकर-पाटील यांनी संजय राऊत आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कांदा निर्यातीवरील अनुदानात ५ टक्क्यांनी वाढ, केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna

परिस्थिती काही करण्यास भाग पाडते

swarit