HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राठोड यांच्या राजीनाम्याबद्दल महंतांनी दिली ‘ही’ माहिती

मुंबई | पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले आहेत. राठोड यांनी अधिवेशनापूर्वी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रमूख विरोधी पक्षांकडून होत आहे. वनमंत्री संजय राठोड आज मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली असल्याचे समोर येत आहे.

पुणे इथे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वन मंत्री संजय राठोड हे आज वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे पोहोचणार असल्याची चर्चा आहे. पोहोरादेवी इथे ते आपल्या मंत्रीपदासोबतच आमदार पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती पोहरादेवी इथले महंत जितेंद्र महाराज यांनी फोनवर दिली आहे

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राठोड यांच्या राजीनाम्याबाबत सूचक ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोणाचाही दबाव नाही असं त्यानी औरंगाबादमध्ये देखील बोलताना सांगितलं आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर काल गंभीर आरोप केले होते. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सरकार बलात्काऱ्याला वाचवत आहे सरकार, पोलीस यांच्याकडे कोणतंही उत्तर नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. तर पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणीही यावेळी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दूध उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर भाजपने स्वत:च्या विरोधात आंदोलन करावे – बाळासाहेब थोरात

News Desk

प्राचार्य चव्हाणांच्या निलंबनासाठी विद्यार्थ्यांचं उपोषण

News Desk

प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, कशाला नोंद घेताय!, अजित पवारांचा पडळकरांना खोचक टोला

News Desk