मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा आज ५० हजारांच्या पुढे गेला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५७,०७४ नवे रूग्ण आढळले आहेत. तर, २२२ रुग्णांचा मृत्यु झाला असून २७,५०८ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
Maharashtra reports 57,074 new COVID cases, 27,508 recoveries, and 222 deaths in the last 24 hours
Total cases: 30,10,597
Active cases: 4,30,503
Total recoveries: 25,22,823
Death toll: 55,878 pic.twitter.com/A9CnzkEbc8— ANI (@ANI) April 4, 2021
तर दुसरीकडे मुंबईत आज ११,१६३ नवे रूग्ण आढळले आहेत. तर २५ जणांचा मृत्यू झाला असून ५२६३ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसेंदिवस राज्यातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची ही वाढती साखळी तोडण्यासाठी सरकारने उद्यापासून (५ एप्रिल) कडक निर्बंध लागू केले आहेत.
Mumbai reports 11,163 new #COVID19 cases, 5263 recoveries and 25 deaths
Total cases: 4,52,445
Total recoveries: 3,71,628
Active cases: 68,052
Deaths: 11,776 pic.twitter.com/S6ASK2WyYA— ANI (@ANI) April 4, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.
नवाब मलिक म्हणाले, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. उद्या रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून ही नियमावली लागू होईल. रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी असेल. इतर वेळी जमावबंदी आदेश लागू असतील. सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील.
उद्योग संपूर्ण क्षमतेनं सुरू राहणार असून, कामगारांवर बंधनं नसतील. जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामं सुरू राहतील. मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन असेल. हा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.