HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

राज्यात १० ते १३ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता !

मुंबई | महाराष्ट्रात १० ते १३ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होणार असल्याची शक्यता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तवली आहे. “विधानसभा निवडणुकीसाठी १० ते १५ सप्टेंबरदरम्यान आचासंहिता लागू होईल आणि १० ते १३ ऑक्टोबर रोजी विधानसभा पार पडेल”, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलत होते. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेवरून आपण यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज लावल्याचे देखील यावेळी गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील यापूर्वी राज्यात सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका पार पडतील, असा अंदाज व्यक्त केला होता. राज्यात येत्या १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल आणि १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान निवडणुका पार पडतील, असा अंदाज चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता. त्याचप्रामणे “शिवसेना-भाजप युती निश्चित आहे. यंदाच्या विधानसभेचे जागावाटप आणि सत्तेत भाजप-शिवसेना युतीचा ५०-५० चा फॉर्म्युला निश्चित आहे”, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले होते.

Related posts

निवडणुकीत बंडखोरी केलेल्या काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार !

News Desk

उर्मिला मातोंडकर यांनी केला काँग्रेसला राम राम

News Desk

लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन, गडकरींचा अधिकाऱ्यांना इशारा

News Desk