HW Marathi
महाराष्ट्र

दहावीचा निकाल : यंदाही मुलींची बाजी, ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे |  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. याबाबत शिक्षणमंडळ अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. राज्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. निकालाच्या बाबतीत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी यात मुलींना ८२.८२ टक्के तर मुलांना ७२.१८ टक्के गुण मिळाले आहेत.  कोकण विभागाचा ८८.३८ टक्के निकाल लागला. दुसऱ्या स्थानावर कोल्हापूर विभाग राहिला. कोल्हापूर  विभागाचा ८२.४८ टक्के लागला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालात १२.३१ टक्के घट झाली आहे.  मंडळामार्फत राज्यात दहावीची परिक्षा राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत १ मार्च ते २२ मार्च दरम्यान घेण्यात आली. दहावीच्या परिक्षेसाठी एकूण १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी तर ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळाचा निकाल

  •  पुणे – ८२.४८
  • नागपूर  – ६७.२७
  • औरंगाबाद – ७५.२०
  • मुंबई  – ७७.०४
  •  कोल्हापुर – ८६.५८
  • अमरावती – ७१.९८
  •  नाशिक – ७७.५८
  •  लातूर – ७२.८७
  • कोकण – ८८.३०

Related posts

गडचिरोली | पोलिसांच्या कारवाईत १६ नक्षलवादी ठार

News Desk

रेशन दुकानावर साखर मिळणार नाही!

News Desk

रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांचा सहयाद्री अतिथीगृह येथे सत्कार

News Desk