HW News Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2021-2022 : राज्यात कृषीपंप जोडणी धोरण राबवणार, महावितरणला १५०० कोटी रुपये प्रस्तावित

मुंबई | कोरोना महामारीच्या संकटात आरोग्य विभागातील अनेक त्रुटी समोर आल्या आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सेवांसाठी ७५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत आहेत.

अजित पवारांनी मांडलेला अर्थसंकल्प

  • बाजार समित्यांच्या बळकटीसाठी २ हजार कोटींची योजना
  • 4 वर्षात बाजारसमित्यांसाठी २ हजार कोटी
  • कृषी पंप जोडणी धोरण राबवणार
  • कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला १५०० कोटी रुपये
  • विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे २१०० कोटींची खरेदी
  • संत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार
  • ५०० भाजीपाला रोपवाटिका उभारणार
  • 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी २०० कोटी देणार
  • राज्यात २७८ सिंचन प्रकल्पांची कामं सुरु
  • बळीराजा जलसिंचन प्रकल्पाअतंर्गत ९१ प्रकल्पांची कामं
  • जलसंपदा विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.
  • गोसी खूर्द प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार

News Desk

भूखंड घोटाळ्यात फडणवीसांचीही चौकशी करा, अंजली दमानिया यांनी केली कोर्टात मागणी

News Desk

कपिल पाटलांच्या जन-आशीर्वाद यात्रेची सांगता, तर आयोजकांवर गुन्हा दाखल

News Desk