HW News Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2021-22 : सहकार व पणन विभागासाठी १२८४ कोटी रुपये देणार

मुंबई | महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२१-२२ उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर करत आहेत. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. आत्तापक्यंत कृषी, आरोग्य, महिला यांच्यासाठी विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत.

अजित पवारांनी मांडलेला अर्थसंकल्प

  • सहकार व पणन विभागासाठी १२८४ कोटी रुपये देणार
  • जलसंपदा विभागाच्या २८७८ कोटींच्या प्रकल्पांचे काम सुरु आहे
  • प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत २६ प्रकल्पांना २१,६९८ कोटी
  • गोसेखुर्दसाठी 1 हजार कोटी मंजूर, डिसेंबर २३ अखेर पूर्ण करणार
  • १२ धरणांच्या बळकटीसाठी ६२४ कोटी रुपये मंजूर
  • जलसंपदा विभागासाठी १२,९५१ कोटी रुपयांची तरतूद
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान- चंद्रकात पाटील

News Desk

पंढरपूर आंदोलन प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

News Desk

“कुणाचाही आधार घेईन, पण एक रासपचा पंतप्रधान नक्की होईन”, महादेव जानकरांची गर्जना

News Desk