HW News Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2021-22 : पुणे-नाशिक जलद रेल्वे मार्गाच्या कामाला राज्यसरकारची मंजुरी

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार मांडत आहेत. कोरोना आणि लॉकडाउनमुळे राज्यासमोर आर्थिक आव्हान उभी आहेत. कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने राज्याला यंदा खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधी उभा करावा लागला. त्यामुळे राज्य सरकार या परिस्थितीवर करण्यासाठी काय करणार यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. महिलांसाठी आज महिला दिनाच्या निमित्ताने खास तरतूगी करण्यात आल्या आहेत.

अजित पवारांनी मांडलेला अर्थसंकल्प

  • राज्यातील ग्रामीण भागात १० हजार किमी रस्त्यांची कामं करण्यात येतील
  • पुणे-नाशिक जलद रेल्वे मार्गाच्या कामाला राज्यसरकारची मंजुरी
  • पुणे-नाशिक मार्गावर २४ प्रकल्प
  • एसटी विभागाला १ हजार ४०० कोटी निधी देण्यात येणार
  • महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची तुकडी ठेवणार
  • आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी ११,३१५ कोटी
  • समृद्धी महामार्गाचे काम ४४% पूर्ण झाले, ५०० किमीचा रस्ता १ मे ला खुला करणार
  • नांदेड ते जालना २०० किमीचा नवा मार्ग उभारणार
  • गोव्याला जाण्यासाठी ५४० किमीच्या समुद्री मार्गासाठी ९५४० कोटी
  • पूर्वमुक्त मार्गाला विलासराव देशमुखांचे नाव देणार
  • ५६८९ कोटींचे रस्त्यांची कामे हाती घेणार
  • सा.बांधकाम विभागास रस्ते बांधकामासाठी १२,९५० कोटी
  • सा.बांधकाम विभागास इमारत बांधकामासाठी ९४६ कोटी रुपये मंजूर
  • ग्रामविकास मंत्रालयाला ७३५० कोटी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रस्त्याच्याकडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका पंकजा मुंडें यांची जलसंपदामंत्र्यांवर टीका!

News Desk

राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वाच्या बाबी

swarit

हसन मुश्रीफांवर अजून एक गंभीर आरोप!

News Desk