HW News Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2021-22 : राज्य सरकारची मोठी घोषणा, ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने

मुंबई | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज (८ मार्च) विधानसभेत राज्याचा २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प मांडत आहेत. यावेळी त्यांनी कृषी, आरोग्य, शेतकरी यांच्यासाठी विशेष तरतूदी केल्या आहेत. तसेच, महिला दिलाच्या दिवशी महिलांनाही खास सूट दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.

अजित पवारांनी मांडलेला अर्थसंकल्प

  • उद्योग व सेवा क्षेत्रात विकास दर घटला
  • कृषी क्षेत्रानेच यंदा अर्थव्यवस्थेला सावरले
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार
  • ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना १९ हजार कोटी थेट वर्ग केले
  • शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन दिले
  • ४२ हजार कोटींचे यंदा पीक कर्ज वाटले
  • ३ लाख रुपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने ११ परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर करणार
  • लातूरच्या बाह्यरुग्ण इमारतीसाठी ७३ कोटी
  • ससून कर्मचारी निवाससाठी २८ कोटी रुपये मंजूर
  • आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय बनवणार
  • मोशीमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारणार
  • आरोग्य विभागास यंदा २९०० कोटी रुपये मंजूर
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?”, मनसुख हिरेनच्या मृत्यूवरुन चित्रा वाघ यांचा सरकारला सवाल  

News Desk

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाच्या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती

Aprna

बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे नगरविकास विभागाच्या माध्यमातून निराकरण करणार

Aprna