HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा ३० डिसेंबरला, सामनाची माहिती

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबरला होणार असल्याची माहिती सामनामध्ये आली आहे. यानुसार सोमवारी (३० डिसेंबर) दुपारी १ वाजता होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल (२३ डिसेंबर) सायंकाळी ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या शपथ विधी सोहळ्याच्या तब्बल एका महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्याला कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिवाळी अधिवेशन संपताच पुढील दोन दिवसांमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. मात्र काँग्रेसकडून कुणाला संधी दिली जाणार याबाबत अंतिम निर्णय न झाल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार काहीसा लांबणीवर पडण्यामागे काँग्रेस जबाबदार असल्याचा खुलासा सामनामध्ये काल आहे. आता या विस्तारासाठी ३० डिसेंबरचा मुहूर्त निश्चित केल्याची माहिती सामनात दिली आहे.

महाविकासआघाडीची अशी असणार मंत्रिपदे

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून १० कॅबिनेट व ३ राज्यमंत्री असे प्रत्येकी १३ आणि काँग्रेसकडून १० जणांचा समावेश मंत्रिमंडळ विस्तारात केला जाणार आहे. शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेसची या दोन्ही पक्षांची आमदारांच्या नावाची मंत्रिमंडळाची संभाव्य यादी तयार आहे. मात्र काँग्रेसकडून मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळातील संभाव्य नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाड इमारत दुर्घटनेत ६० जणांना वाचवण्यात यश तर एकाचा मृत्यू

News Desk

इंदोरीकर महाराजांना पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

News Desk

पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज!

News Desk