गडचिरोली | राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील जांभुरखेडा गावाजवळ भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात १६ जवान शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव गडचिरोलीतील पोलीस मैदानावर येताच क्षणी जवानांच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. यावेळी नातेवाईकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis pays tribute to the security personnel who lost their lives in the IED blast attack by Naxals in Gadchiroli, yesterday. pic.twitter.com/gxr8HsW8Ru
— ANI (@ANI) May 2, 2019
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (२ मे) सकाळी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गडचिरोलीचे पोलीस आधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्यासह नक्षलवादी विरोधी पथकाचे अधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.