HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर आठ आमदार आज (१८ मे) शपथ घेतली आहे. यात काँग्रेसचे राजेश राठोड, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे तर भाजपकडून रणजीतसिंह मोहिते पाटील, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतील. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे कुटुंबीय उपस्थि होते.

विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल १४ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिनांक होता. १३ उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भारतीय जनता पार्टी), संदीप सुरेश लेले (भारतीय जनता पार्टी), किरण जगन्नाथ पावसकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), शिवाजीराव यशवंत गर्जे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) या चार उमेदवारांनी १२ मे रोजी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले.

कोरोनामुळे निवडणुक आयोगाने राज्यातील नवीमुंबई महानगर पालिका आणि औरंगबाद पालिका निवडणुका रद्द केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्याचबरोबर घटनेच्या कलम १६४ (४) नुसार त्यांना पदावर कायम राहण्यासाठी मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणे आ‌वश्यक आहे. आणि हा सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजे २८ मे पूर्वी ठाकरे यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य होणे बंधनकारक आहे.

 

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमदारकीची शपथ घेणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार

ठरलं ! उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेचे ९ आमदार ‘या’ दिवशी घेणार आमदारकीची शपथ

महाविकासआघाडी ५ जागांवर लढणार, विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार !

विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर ‘या’ नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या अर्थव्यवस्थेवर रघुराम राजन यांच्यासोबत राहुल गांधींनी केली ‘या’ मुद्द्यावर चर्चा

News Desk

लॉकडाऊन दरम्यान चाईल्ड पॉर्नच्या प्रमाणात भारतात वाढ, सायबर विभाग कारवाई करणार | अनिल देशमुख

News Desk

कोरोनाबाधित रुग्णांवर ‘या’ औषधाचा होत आहे चांगला परिणाम

News Desk