मुंबई | कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२२ मार्च) राज्यातील कलम १४४ लागू करण्यात आली आहे. राज्यात आज (२२ मार्च) मध्य रात्रीपासून कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू होणार आहे. अन्नधान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील. बँका, वित्तीय संस्था या सारख्या जीवनाश्यक सेवा सुरूच राहतील.
Intercity bus services will remain suspended in Maharashtra till March 31. However, BEST buses will ply on the roads of Mumbai for people involved in essential services. All essential services including banks & share market will remain open: Maharashtra CM #CoronavirusPandemic https://t.co/3OtyYHRebe
— ANI (@ANI) March 22, 2020
दरम्यान, जमाव बंदी लागू केल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याची उपस्थिती ५० टक्के केली होती, ती काल २५ टक्के केली आणि आता राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्याची उपस्थिती ही ५ टक्क्यावर केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज ( २२ मार्च) सोशल मीडियाद्वारे जनतेला संबोधित करताना म्हणाले. ज्या लोकांच्या हाताववर होम क्वारंटाईन सांगितले आहे. ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे राहा.
मुख्यमंत्र्यांच्या आज घेतलेले महत्तवाचे निर्णय
- महाराष्ट्र पूर्णपणे लॉक डाऊन
- आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू, ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर निर्बंध
- देशात परदेशी विमानांना आज मध्यरात्रीपासून बंदी
- लोकल सेवा बंद , रेल्वे, खासगी बसेस, एस टी बसेस बंद
- जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील
- अन्न-धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकानं सुरुच राहातील
- बँका, वित्तीय संस्था सुरुच राहातील
- शासकीय कार्यालयात आता केवळ 5 टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील, जमेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करावं
- सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.