HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १६९ मतांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर

मुंबई | महाविकासआघाडीच्या सरकारचे बहुमत अखेर सिद्ध झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाविकासआघाडीने विश्वासदर्शक ठराव १६९ मतांनी बुहमत सिद्ध झाले आहे. बुहमत चाचणीसाठी विधानसभेचे २ दिवसीय अधिवेशन बोलविण्यात आले आहे. यानुसार आज (३० नोव्हेंबर) दुपारी २ वाजता महाविकासआघडीच्या बुहमताचा प्रस्ताव काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभेत मांडला. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी चव्हाणांच्या ठरावाला अनुमोदन दिले.

“हो, मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. हो मी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेईल, हो मी आई वडिलांची शपथ घेतली मी पुन्हा घेईल. जर हा गुन्हा असेल तर तो एकदा नाही, मी दहा वेळा नाही, प्रत्येक जन्मात केल्याशिवाय राहणार नाही.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचप्रमाणे मी महाराष्ट्राची संस्कृती नाही, हा शिवरायांचा महाराष्ट्र अपेक्षित घड आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत पहिले भाषणात म्हटले आहे. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शिरगणेनुसार मतमोजणी करण्यात आली.

राज्यात बुहमत सिद्ध करण्यासाठी १४५ आकडा असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा अधिकमताधिक्यांनी महाविकासआघाडीने बुहमत सिद्ध केले आहे. त्यानुसार काँग्रेस ४४, राष्ट्रवादी ५४, शिवसेना ५६, प्रहार २, सीपीएम १ बविआ ३, समाजवादी पार्टी २, स्वाभिमानी शेतकरी १,जनसुराज्य १, शेकाप १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, अपक्ष ४ असे मिळून महाविकासआघाडीला १६९ बहुमत सिद्ध केले आहे मात्र माकप, एमआयएम, मनसे या पक्षातील ४ आमदारांनी तटस्थ राहणे पसंद केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी अमित शाहांशी ‘या’ विषयावर केली सकारात्मक चर्चा

Aprna

“सुनलो हमारी बात…” आमदार बच्चू कडूंचे पावसात सरकारविरोधी आंदोलन

News Desk

पुण्यात शाळा नव्या वर्षात सुरु होणार  – मुरलीधर मोहोळ

News Desk