HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या १० वर, नागरिकांनी घाबरू नये !

मुंबई | पुण्यापाठोपाठ आता मुंबईत कोरोनाचे २ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोनामुळे घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. मात्र,गर्दी टाळली गेलीच पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी आज (११ मार्च) माध्यमांशी बोलताना सांगितले.

कस्तुरबा रुग्णालयातील ६ कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली. या चाचणी ६ पैकी ४ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर २ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आता

पुण्यात ८ तर मुंबईत २ अशा एकूण १० जण कोरोनाबाधित आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. तसेच पुण्यात जमावबंदी लागू करण्यात आली असून शक्य झाल्यास मुंबईत देखील जमावबंदी जारी करण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, शिंकताना किंवा खोकताना तोंडावर हात ठेवा. अशी काळजी घेतल्यास नक्कीच कोरोनाचा सामना आपण करू शकू.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

पुण्यात ८ आणि मुंबईत २ असे महाराष्ट्रात कोरोनाचे १० पॉझिटीव्ह रुग्ण

परदेशातून येणाऱ्यांची तपासणी सुरु, त्यांना घरातच वेगळे राहण्याची सुचना, घाबरण्याचे कारण नाही

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघात जायला हवेत, म्हणून अधिवेशनाचे कामकाम पूर्ण करुन शनिवारी किंवा रविवारी संपवायचा विचार आहे

सध्या शाळांना सुट्टी देण्याचा विचार नाही, आवश्यकता लागली तरच शाळांना सुट्टी

आयपीएलच्या सामन्याबाबत अधिकृत काही प्रस्ताव नाही, मात्र गर्दी टाळायला हवी, प्रेक्षकांशिवाय सामना खेळवण्यास आयोजक तयार असल्याचे सांगितले जात आहे

दहावीची परीक्षा सुरु आहे, त्यामुळे २ दिवस थांबावे, त्यानंतर आवश्यक असल्यास शाळांना सुट्टी देण्यावर निर्णय घेऊ

आवश्यकता पडल्यासच शाळा, महाविद्यालये बंद

मास्क लावण्याची गरज नाही, सर्दी-खोकला झाला असेल तर रुमाल वापरा, हात स्वच्छ ठेवावेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विनाकारण बाहेर निघाल तर निघेल गाढवावरून धिंड, गावकर्‍यांनी घेतला एकमुखाने निर्णय

swarit

“आता सामान्य लोकांनी विमानाचा…” रोहित पवार

News Desk

Goodbye 2021 : ‘या’ नेत्यांना वर्षभरात आली ईडीची नोटीस

Manasi Devkar