HW News Marathi
देश / विदेश

विधेयकाला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही, भ्रमातून प्रथम बाहेर !

मुंबई | नागरिकत्व दुरुस्ती विधेयक काल (९ डिसेंबर) लोकसभेत मंजूर झाले आहे. या विधेयकाला सामनाच्या अग्रलेखातून विरोध करणाऱ्या शिवसेनेने देखील याला पाठिंबा दिला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली की, “या विधेयकाला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही, या भ्रमातून आपण सर्वांनी पहिल्यांदात बाहेर यावे, असे अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच या विधेयकासंदर्भात जे प्रश्न शिवसेनेने उपस्थित केले, त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले नाही, ही गोष्ट देखील मुख्यमंत्र्यांनी नमुद केली आहे.

तसेच “देशात पूर्णपणे एका वादात अडकून ठेवायचे आणि जवनावश्य, जीवन मरणाच्या प्रश्नाची उत्तर न देता, देश ठकलत न्यायचा याला मी कारभार मानत नाही,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी देशाच्या सध्याच्या परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर तोफ डागली. कोणाला बरे वाटावे किंवा वाईट वाटावे, म्हणून कदिच वागली नाही आणि वागणार नाही, असे म्हणत त्यांनी या विधेयकाला शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. या विधेयकामधील सत्यता आणि स्पष्टता लोकांसमोर मांडली पाहिजे. या विधेयकामधील सत्यता आणि स्पष्टता लोकांसमोर मांडली पाहिजे. या विधेयकात अधिक स्पष्टता येण्याची गरज आहे. तसेच या विधेयकासंदर्भात जोपर्यंत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत शिवसेना राज्यसभेत मतदान करणार नाही, अशी भूमिका देखील उद्धव ठाकरेनी घेतली आहे.

विधेयक लोकसभेत असे मंजूर झाले

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक काल लोकसभेच मंजूर झाले. या विधेयकावर लोकसभेत जवळपास १२ तास चर्चा सुरू होती. या प्रदीर्घ चर्चेनंतर विधेयकाला बाजूने ३११ सदस्यांनी मतदान केले तर विरोधात ८० खासदारांनी मतदान केले. मात्र, शिवसेना विधेयकाच्या विरोधात मतदान करणार असे वाटत असताना शिवसेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या खासदारांची संख्या अधिक असल्याने सरकारला लोकसभेत विधेयक मंजूर करून घेण्यास फार अडचणींना सामना करावा लागला नाही. हे विधेयक मंजूर होण्यासाठी भाजपने आपल्या खासदारांना व्हीपही जारी केली होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट

Gauri Tilekar

मनातील कटुतेला तिलांजली देण्याचा आजचा दिवस !

News Desk

बेळगावमध्ये समितीचा पराभव शिवसेनेमुळे ?

News Desk