वर्धा | हिंगणघाट जळीत कांडातील पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी झाली आहे. पीडितेने गेल्या सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयातमध्ये आज (१० फेब्रुवारी) पीडित तरुणींची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. ‘ही हत्या असून याला शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray in Mumbai: The incident is so barbaric that words are not enough to describe it. I will plead to everyone to have patience. The suspects will be punished soon. This government will take strict action. https://t.co/WzRewWAufy pic.twitter.com/oq5px6pjN8
— ANI (@ANI) February 10, 2020
दरम्यान, दरम्यान, ‘आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. या खटल्याचा पाठपुरावा करुन, तो लवकरात लवकर निकाली काढू. अनेकदा खटला लांब चालतो. निकाल लागल्यानंतरही अंमलबजावणीसाठी वेळ लागतो. मी तसे होऊ देणार नाही, लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल. असं कृत्य करण्याचं धाडस होणार नाही, असा कायदा करू. आंध्रसारखा कायदा करून आणि तो कायदा नेमका काय आहे. आणि त्या आणखी सुधारणा करून कडक असा कायदा करून असे आश्वास मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाबद्दल माहिती
नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला पीडित तरुणी हिंगणघाट शहरात सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी नंदोरी चौकवरून जात होती. यावेळी आरोपी विक्की नगराळे तिचा तिचा पाठलाग करत होता. आरोपीने पीडितेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली. पीडित तरुणीवर नागपूरच्या ऑरेज रुग्णालयात उपचार सरू असून पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.