नागपूर | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात हिंसाचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील “जनतेला शांतता-सुव्यवस्थेला गालबोट लागेल असे वागू नका, असे आवाहन केले आहे. शांतपणे आंदोलन करा, पण कायदा हाता घेऊ नका,” असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कोणाच्याही हक्काला धक्का लाऊ देणार नाही, याची काळजी सरकार देईल, अशी ग्वाही आश्वास मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray in Nagpur: I appeal to people of Maharashtra to maintain peace and calm. Maharashtra government will ensure that no one's rights are snatched away. pic.twitter.com/unFfUCUCLk
— ANI (@ANI) December 20, 2019
सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल अनेकांच्या मनात भीती आहे. या कायद्याबद्दल अनेक गैरसमजदेखील आहेत. त्यामुळे देशातच गैरसमजाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या कायद्याविरोधात राज्यासह देशभरात कित्येकजण रस्त्यावर उतरले आहेत. काही भागांमध्ये हिंसाचाराच्या घटनादेखील घडल्या आहेत. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागेल, अशी कोणतीही कृती नागरिकांनी करू नये, असे आवाहन मी जनतेला करतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात कायद्याबाबत चर्चा व्हायची आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात भिती बाळगू नये. कायद्याला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत निवेदन द्यावे. त्याबाबत आपण संबंधितांशी चर्चा करण्यास तयार आहोत, यावेळी ते म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.