HW News Marathi
महाराष्ट्र

मोदींविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाना पटोलेंचा युटन

मुंबई | महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नाना पटोलेंचे हे वादग्रस्त वक्तव्य केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नाना पटोले हे त्यांच्या कार्यकर्त्यांशी आपआपात बोलताना हे वादग्रस्त व्यक्तव केले आहे. नाना पटोलेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल असून त्यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका होत आहे. यानंतर नाना पटोलेंनी युटन घेतला आहे. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले ते व्यक्तव्य  “मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो,” असे वादग्रस्त व्यक्तव्य नाना पटोलेंनी केले आहे. 

नाना पटोले म्हणाले, “मी का भांडतो मी गेल्या ३० वर्षापासून राजकारणात आहे. लोक पाच वर्षात आपल्या पिढीचा उधार करतात. यावेळी सगळे शाळा, कॉलेज उभारून एका काय दोन पिढीचा उधार करतात. मी ऐवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा आणि ठेकेदारी नाही घेतली. जो आला त्याला मदत करतो, म्हणून मी मोदीला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्याविरोधात प्रचाराला आला. तुमच्या येथे एक प्रामाणिक लिटरशीप येथे आहे. त्याला हे सर्व पैशेवाले लोक आपली रणनिती करून ज्यांना चक्रव्यहात फसवत असतील.”

प्रदेशाध्यक्ष पणाचा इतका बालीशपणा मांडून ठेवलाय – प्रवीण दरेकर

“नाना पटोले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलताना असे वाक्य बोले असतील ते अत्यंत दुदैवी आणि राजकारणासाठी चिंता करण्यासाठी आहे,” अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना केले आहे. “खरे पाहायला गेले तर नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अशा प्रकारचे वादग्रस्त व्यक्तव्य त्यांनी अनेकदा केले आहे. मोदीला मारू शकतो, बोलू शकतो इतपर्यंत ठिक आहे. राजकारणात आपण वेगवेगळ्या लोकांवर टीका करत असतो. राजकीय टीका असतात, सरकारवर टीका करतो, परंतु अशा प्रकारचे व्यक्तव्य हे भयानक आहे, काँग्रेसला आज देशभरात यश नसले तरी व्यैभवशाली परंपरा असलेला हा पक्ष आहे. या पक्षातील अनेक नेते हे वगळ्या व्यक्ती महत्वाचे होऊ गेलेत. आजही आहेत. परंतु नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पणाचा इतका बालीशपणा मांडून ठेवलाय. की आता ते नेहमी बालीश व्यक्त करत असतात,” ते म्हणाले.

मी नरेंद्र मोदींबद्दल नव्हे तर गावगुंडे मोदीबद्दल बोलत होतो –  नाना पटोले

“आमच्या भागामध्ये निवडणुका चालू आहे. आमच्या भागात मोदी नावाच गावगुंड आहे. त्याची तक्रार गावकरी माझ्याकडे करत होते. जो गावगुंड मोदी आहे त्यांच्याविरोधात माझे हे व्यक्तव्य आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही ९ मराठीला दिले आहे. “या व्हिडिओमध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव कुठे घेतले नाही. आणि मी अशा पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य करत नाही. तुम्ही व्हायरल व्हिडिओ पाहा मी प्रधानमंत्री आणि नरेंद्र पण शब्द वापरलेला नाही. मी मोदी असा शब्द वापरला. माणूस हा केव्हा घाबरतो, जेव्हा त्याचे घर काच्चे असते, तेव्हा तो घाबरतो. माझे घर काच्चे नाही. त्यामुळे मला कोणाला घाबरण्याची गरज नाही. गावातील लोक माझ्याकडे गावगुंडची तक्रार करत होते. आणि योगा योगाने त्यांचे नाव मोदीच आहे. माझा व्हायरल होणार व्हिडिओ हा कुठल्या सभेतला नसून मी गावकऱ्यांचे ऐकून त्यांना समजून सागत होतो, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.          

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तर मी भाजपमध्ये जाऊन त्यांची सेवा करेन – बच्चू कडू

News Desk

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या आंबा महोत्सवात आग

swarit

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून ३ जणांची निर्घृण हत्या

News Desk