HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज ७,८६२ नवे कोरोना रुग्ण आढळले, २२६ जणांचा झाला मृत्यू

मुंबई | राज्यात आज (१० जुलै) ७,८६२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या चोवीस तासांत २२६ मृत्यूंची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आहे ५,३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ३८ हजार ४६१ झाली आहे. यापैकी १ लाख ३२ हजार ६२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ९ हजार ८९३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

 

राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा ४.१५ टक्के इतका झाला आहे. आत्तापर्यंत १२ लाख ५३ हजार ९७८ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यापैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ६ लाख ७४,०२५ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४६,५६० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

Related posts

आदी(त्य) घोषणा अन् नंतर होमवर्क, सरकारच्या निर्णयावर शेलारांची बोचरी टीका  

News Desk

भेंडीबाजार इमारत कोसळून आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी

News Desk

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk