HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज ६,७४१ नवे रुग्ण, तर २१३ जणांचा झाला मृत्यू

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासात ६,७४१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २१३ रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज एका दिवसात ४,५०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १ लाख ४९ हजार ७ इतकी झाली आहे. आणि रिकव्हरी रेट ५५.६७ टक्के झाला आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही २,६७,६६५ इतकी झाली आहे. यापैकी १ लाख ७ हजार ६६५ अॅक्टिव्ह आहेत. तर १,००, ४९ हजार रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे १०,६९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related posts

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

कोल्हापूरातील ‘या’ अपक्ष आमदाराचा शिवसेनेला पाठिंबा

News Desk

शिवस्मारक ठरणार जगातील सर्वात उंच स्मारक