HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

राज्यात आज कोरोनामुक्त रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा जास्त

मुंबई |राज्यात आज (१२ ऑगस्ट) नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये १३,४०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर  कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या आता ३ लाख ८१ हजार ८४३ इतकी झाली आहे.

राज्यात १२ हजार ७१२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण संख्या ५ लाख ४८ हजार ३१३ वर पोहोचली आहे. राज्यात सध्या १ लाख ४७ हजार ५१३ अॅक्टिव्ह केसेस आहे.

तर दुसरीकडे राज्यात चोवीस तासांमध्ये ३४४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात १८ हजार ६५० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून तो आता ६९.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

Related posts

मोबाइल ने घेतला घात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू

News Desk

मुंबईच्या दाट लोकवस्तीत निर्जंतुकीकरणासाठी महापालिकेने ड्रोनचा वापर करावा, राजेश टोपेंच्या सूचना

News Desk

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटले सातबारा

News Desk