HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यात आतापर्यंत तब्बल १३ लाखांहूनही अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (१६ ऑक्टोबर) जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ११ हजार ४४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, याच एका दिवसात तब्बल १३ हजार ८८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत तब्बल १५ लाख ७६ हजार ६२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी १३ लाख ४४ हजार ३६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयांतून डिस्चार्ज मिळाला आहे. तर सद्यस्थितीत राज्यात १ लाख ८९ हजार ७१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत तब्बल ४१ हजार ५०२ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

 

 

Related posts

उल्हासनगरात गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू ,डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी मृतदेहासह ठिय्या आंदोलन

News Desk

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू | फॉरेन्सिक रिपोर्ट

News Desk

यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण लागू नाही | नागपूर खंडपीठ

News Desk