मुंबई । राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (२४ सप्टेंबर) देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल १९ हजार १६४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण २ लाख ७४ हजार ९९३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
राज्यात आज 19164 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 17184 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 973214 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 274993 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 75.86% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 24, 2020
राज्यासाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या २४ तासांत राज्यात नवे १७ हजार १८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून हे रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची राज्यातील एकूण संख्या लाख ७३ हजार २१४ वर पोहोचली आहे. तर राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट आता ७५.८६% आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण दिलासादायक आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.