HW News Marathi
Covid-19

कर्नाटकने महाराष्ट्राला टाकलं मागे, महाराष्ट्राने रोजची रुग्णसंख्या आणि मृतांच्या यादीत गाठला उच्चांक

कर्नाटक | कर्नाटकमध्ये आज (११ मे) सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच कर्नाटकने दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृतांच्या यादीत महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर ढकललं असून नकोसं पहिलं स्थान मिळवलं आहे. भारतात फेब्रुवारीच्या मध्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून पहिल्यांदाच कर्नाटकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

कर्नाटकमध्ये काल २४ तासांत ३९ हजार ३०५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर एकूण ५९६ जणांचा मृत्यू झाला. एकीकडे देशातील एकूण रुग्णसंख्या दोन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच साडे तीन लाखांपेक्षा कमी झाल्याची नोंद होत असताना कर्नाटकमध्ये मात्र चिंता वाढवणारी संख्या समोर आली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात काल ३७ हजार २३६ रुग्णांची तर ५४९ मृत्यूंची नोंद झाली आहे.

कर्नाटकमध्ये सर्वाधिक मृत्यू बंगळुरुमध्ये नोंदवण्यात आले. बंगळुरुत ३७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याआधी बंगळुरुत ७ मे रोजी सर्वाधिक ३४६ मृत्यूंची नोंद झाली होती. सोमवारी दिल्लीत सर्वाधिक ४०० मृत्यूंची नोंद झाली असून बंगळुरु दुसऱ्या क्रमांकावर होतं. बंगळुरुमध्ये आतापर्यंत करोनामुळे ८४३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हाच का तो तुमचा ‘सायन पॅटर्न’?- आशिष शेलारांचा सवाल

News Desk

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा ‘कोरोनामुक्त’ झालेल्यांचा आकडा मोठा

News Desk

“मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हीच केंद्र सरकारची इच्छा आहे का?”

News Desk