मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या तर वाढत आहेच. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही चुकीची माहितीही समाजातील काही घटकांद्वारे दिली जात आहे. यावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर यांनी समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध एकूण २०१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर, आत्तापर्यक ३७ जणांना अटकही करण्यात आली आहे.
#Lockdown21 च्या पार्श्वभूमीवर काही गुन्हेगार व समाजकंटकांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध @MahaCyber1 ने दाखल केले २०१ गुन्हे, ३७ जणांना अटक. pic.twitter.com/yyVxWLTJY1
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 15, 2020
महाराष्ट्रात आत्तापर्यंत बीड २६, कोल्हापूर १५, जळगाव १३, पुणे ११, मुंबई १०, सांगली १०, जालना ९, नाशिक ८, सातारा ७, नांदेड ७, परभणी ७, नाशिक शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५, ठाणे शहर ५, बुलढाणा ४, पुणे शहर ४, लातूर ४, गोंदिया ४, सोलापूर ५, सोलापूर शहर ३, नवी मुंबई २, उस्मानाबाद २, ठाणे १, धुळे १ या ठिकाणच्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
बीड २६, कोल्हापूर १५, जळगाव १३, पुणे ११, मुंबई १०, सांगली १०, जालना ९, नाशिक ८, सातारा ७, नांदेड ७, परभणी ७, नाशिक शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५, ठाणे शहर ५, बुलढाणा ४, पुणे शहर ४, लातूर ४, गोंदिया ४, सोलापूर ५, सोलापूर शहर ३, नवी मुंबई २, उस्मानाबाद २, ठाणे १, धुळे १
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 15, 2020
समाजात कोरोनाविषयी चुकीची माहिती पसरवू नका. आणि जे कोणी पसरवतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. तसेच, ट्विटरवरुनही महाराष्ट्र सायबर याबद्दल जनजागृती निर्माण करत आहे.
चुकीची माहिती, द्वेषयुक्त भाषण, बनावट बातम्या पसरवू नका आणि कोरोनाव्हायरस प्रसार थांबविण्यास मदत करा.
।। दक्ष रहा, सायबर सुरक्षित रहा।।@DGPMaharashtra @MahaDGIPR
#Lockdown #CoronavirusOutbreak #ThursdayThoughts #SayNoToFakeNews #StopRumours #MahaCyber #MaharashtraFightsCorona pic.twitter.com/btXI3gNFx3— Maharashtra Cyber (@MahaCyber1) April 16, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.