मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. काल (२३ नोव्हेंबर) शपथ विधीसोहळ्यानंतर महाराष्ट्रच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. यानंतर पवार कुटुंबामध्ये फुट पडली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अखेर आज (२४ नोव्हेंबर) अजित पवार यांनी ट्वीट केले आहे. “राज्यात स्थिर सरकार देण्याचे आश्वासन देऊन,” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देत त्यांचे आभार मानले. यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या ट्वीट हँडेलवर उपमुख्यमंत्री असे नमुद केले आहे.
Thank you Hon. Prime Minister @narendramodi ji. We will ensure a stable Government that will work hard for the welfare of the people of Maharashtra. https://t.co/3tT2fQKgPi
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
तसेच अजित पवारांनी पुन्हा एकदा ट्वीट करत म्हटले की, “मी राष्ट्रवादीचाच नेता आणि शरद पवार हेच आमचे नेते असणार आहेत. भाजप-राष्ट्रवादी मिळून राज्याला स्थिर सरकार देऊ,” हे सरकार पुढील पाच वर्ष यशस्वी काम करेल असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच अजित पवार पुढे म्हणाले की, “काळजीचे कारण नाही, थोडे धैर्य धरा,” असे आव्हान देखील राज्याच्या जनतेला त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.
I am in the NCP and shall always be in the NCP and @PawarSpeaks Saheb is our leader.
Our BJP-NCP alliance shall provide a stable Government in Maharashtra for the next five years which will work sincerely for the welfare of the State and its people.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
अजित पवार यांचे मनवळविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ देखील केले आहेत. मात्र, या सर्वांना अजित पवारांचे मनवळविण्यात यश आले नाही. शपथ विधीनंतर शांत राहिलेले अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी आदी भाजपच्या नेत्यांचे आभार मानले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.