HW News Marathi
महाराष्ट्र

साईबाबा जन्मस्थळाचा वाद : शिर्डीत आजपासून बेमुदत बंद

शिर्डी। साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी असलेल्या वादाच्या निषेधार्थ आजपासून (१९जानेवारी) शिर्डीत बेमुदत बंदला सुरुवात झाली आहे. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी (१८ जानेवारी) रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर भक्तांनसाठी खुले राहणार असून दुकाने, बाजार मात्र बंद राहतील. या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका सभेत पाथरी साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत १०० कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर ठिणगी पडली. पाथरी गावाच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, जन्मस्थळाला विरोध असल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डीकरांनी बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री साईबाबा यांच्या जन्मस्थळ यावर भूमिका मांडत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

पाथरी गावाला १०० नाही तर २०० कोटींची निधी द्यावा, आमचा काहीही विरोध नाही. मात्र, साईंचा जन्मस्थळ म्हणून पाथरीला आमचा विरोध असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. थोर अवतारी पुरूष संत श्री साईबाबा यांचे कर्मस्थान शिर्डी हे जगप्रसिद्ध आहे. मात्र, त्यांचे जन्मस्थळ हे परभणी जिल्ह्यातील पाथरीच आहे. यासाठी आमच्याकडे २९ पुरावे असल्याचा दावा देखील पाथरीकरांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोमय्या खोट्या सहीनिशी FIR नोंदविल्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल

Aprna

बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवीवर कन्नड नागरिकांनी फासले काळे

News Desk

कोविडमुळे संसदेचे अधिवेशनच रद्द करणाऱ्या मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार ? सचिन सावंत

News Desk