HW News Marathi
महाराष्ट्र

 उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग, ४ जणांचा मृत्यू

नवी मुंबई | उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला भीषण आग लागली असून या आगीमुळे ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या मृतांमध्ये दोन जण अग्निशमन दलाचे कर्मचारी असल्याचे समजते. लिक्विड लिकेजमुळे आग लागल्याची माहिती सध्या मिळत आहे. ही आग आज (२ सप्टेंबर) सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली आहे. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. जेएनपीटी आणि ओएनजीसी फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

या आगीत गंभीर जखमी झालेल्या कामगारांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्लांटमध्ये नेमके किती कामगार कामावर होते याबाबत नेमकी माहिती कळू शकलेली नाही. मात्र, सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. आगीची भीषणता लक्षात घेता प्रशासनाकडून जवळपासच्या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून ओएनजीसी प्रकल्पापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत नागरिकांची ये-जा बंद करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काकडी लागवडीमुळे शेतकरी झाला कर्जबाजारी

News Desk

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी… महिलेवर गँगरेप करणार्‍या आरोपींना कडक शिक्षा द्या – जयंत पाटील

News Desk

जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Aprna