HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्रात पुन्हा एकदा ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला

मुंबई | महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊनला एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली. राज्यात लॉकडाऊन हा ३१ जुलैपर्यंत वाढविला असला तरी यात  काही प्रमाणात शिथीलता देण्यात आल्या आहेत.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  काल (२८ जुलै) 30 जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, पण काही अत्यावश्यक सेवा सुरू करणार असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यातील अनलॉकमध्ये आणखी काय शिथिलता मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राज्यात आज (२९ जून) लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन हळूहळू सर्व सुरू करण्ता आले. मात्र, राज्यात रुग्णांची संख्याही वेगाने वाढू लागली. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ५ हजाराहून अधिक होत आहे. सध्या राज्यात रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत.

 

Related posts

विधानपरिषद रिक्त जागेबाबत राज्यपालांना केलेल्या विनंतीचा पुनरुच्चार

News Desk

न्या. गोयल यांना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदावरून त्वरित हटवा

News Desk

पाणी टंचाई उपाय व स्वच्छता विषयक घटकासाठी समन्वयाने सांघिकरित्या प्रयत्न करा – सदाभाऊ खोत   

News Desk