HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पोलीस दलात मोठे बदल, गुन्हे शाखेच्या तब्बल ६५ अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी प्रकरण, उद्योजक मनसुख हिरे मृत्यू, सचिन वाझे या सगळ्या प्रकरणांमुळे राज्य सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. त्यानंतर पोलिसांच्या बदल्यांसाठी रॅकेट सुरु असल्याचे आरोप राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केले. ही सगळी संकटं समोर असताना मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या एकूण ६५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुकेश अंबानी धमकी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी एपीआय रियजुद्दीन काझी आणि एपीआय प्रकाश होवाळ यांचीसुद्धा बदली करण्यात आली आहे.

पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्यात मोठे रॅकेट सुरु असल्याचा अहवाल दाबल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. संपूर्ण राज्यातून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेत तब्बल ६५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजेच मुंबईतील सर्व युनीट प्रमुखांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सीआययू युनिटचे एपीआय रियजुद्दीन काझी यांना सशस्त्र पोलीस दलात पाठवण्यात आलंय. तर सीआययू युनिटचे एपीआय प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी मुकेश अंबानी धमकी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सरकारवर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू, सचिन वाझे खंडणी, मुकेश अंबानी धमकी आणि आता पोलिसांच्या बदल्यांसाठी रॅकेट अशा अनेक प्रकारचे संकटं राज्य सरकारसमोर उभे टाकले आहे. विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका होत आहे. १५ वर्षांपासून निलंबित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेतलं जातं. याच पोलिसावर खंडणीचे आरोप होतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस दलावरील विश्वास उडाल्याचं म्हटलंय. तसेच, पोलीस दल तसेच राज्य सरकारने चिंतन करण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलात हे मोठे बदल करण्यात आले आहेत.

 

देवेंद्र फडणवीसांनी काय केले होते आरोप?

दरम्यान, गृहसचिवांना भेटायला जाण्यापूर्वी फडणवीस यांनी राज्यातील बदली रॅकेटचा पर्दाफाश केला होता. परमबीर सिंग हे तक्रार करणारे पहिले व्यक्ती नाहीत. डीजींनी यापूर्वी एक रिपोर्ट दिला आहे. यापूर्वी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी एक रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता. हा ६.३ जीबीचा डेटा आहे. त्या सर्व कॉल रेकॉर्ड आहे. मी मुख्यमंत्री असताना २०१७ एका हॉटेलमध्ये काही डिलिंग सुरू असल्याचं कळलं होतं. तिथे काही पोलीस जात असल्याचं कळलं होतं.

त्यामुळे पोलिसांनी तिथे धाड टाकली आणि सात ते आठ जणांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले. चार्जशीटही केलं. त्याच सीओआय आता आहेत. त्यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी डीजीची परवानगी घेतली आणि काही लोकांचे नंबर इंटरसेप्शनवर लावले. त्यात काही पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे अनेक विस्फोटक संवाद समोर येऊ लागले.

हे पाहिल्यानंतर त्यातनं खूप मोठं रॅकेट झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याच्याशी गृहमंत्रालयाच्या लोकांचे संबंध दिसत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे सीओआय म्हणजे कमिशनर ऑफ इंटेलिजन्सने या प्रकरणाचा एक रिपोर्ट तयार केला. त्यांनी हा रिपोर्ट पोलीस महासंचालकांना दिला आणि नंतर तो मुख्यमंत्र्यांकडे गेला. ८ ऑगस्ट २०२० मध्ये हा अहवाल देण्यात आला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी हे सर्व ऐकून घेतलं, मात्र त्यावर काहीच कारवाई केली नाही, असं फडणवीस म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंनी BMC आयुक्तांना पत्र लिहून गिरगाव व्ह्यूइंग डेकची पुन्हा एकदा मागितली माहिती

Aprna

बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

News Desk

सरासरी राज्य सरकारने वीज ग्राहकांसोबत बनवाबनवी केली – आशिष शेलार

News Desk