HW News Marathi
Covid-19

मराठी सिनेमा आणि महाराष्ट्रातील सिनेमागृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देणार !

मुंबई | “काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते पण आज मराठी सिनेमा पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी सिनेमांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी सिनेमांचे आणि महाराष्ट्रातील सिनेमागृहांचे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देईल”, असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग फ्लिम मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर ३ दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, “आज मराठी सिनेमा गावागावात पोहोचणे आवश्यक असून यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन माध्यमाचा वापर करून अशा वेगळ्या पद्धतीचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले याचा आनंद होत आहे. तीन दिवस सादर करण्यात आलेल्या चर्चासत्रात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रासाठी धोरण ठरत असताना या सगळ्या बाबींचा विचार करून एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचा राज्य शासन प्रयत्न करणार आहे. चित्रपट, माध्यम व करमणूक धोरण आखण्यासाठी या विषयातील तज्ञांकडून ठोस सूचना मिळतील”, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

“मराठी सिनेमा, कला, नाट्य आणि साहित्य क्षेत्र प्रचंड समृद्ध आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमाबरोबर आज मराठी सिनेमा स्पर्धा करीत असतो. मराठी सिनेमा निर्मिती, दिग्दर्शित करणारे खूप प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून अनेक संकटांना सामोरे जाऊन वेगळी कलाकृती तयार करण्याचे धाडस दाखवतात याचा आनंद वाटतो. येत्या काळातही आपल्या सगळ्यांनी वेगवेगळ्या कलाकृती निर्माण कराव्यात, याकरिता महाविकास आघाडीचे शासन आपल्या पाठीशी आहे”, असेही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात लॉकडाऊनचा प्रश्नच येत नाही ! । पंतप्रधान मोदी

News Desk

कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

News Desk

देशातील ‘या’ ६ कोविड संवेदनशील राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक

News Desk