HW News Marathi
Covid-19

संकटांवर धैर्याने मात करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे !

मुंबई | देशासह महाराष्ट्र कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारची संकट महाराष्ट्राने याआधीही पाहिली आहेत. पण संकटावर मात करण्याची हिंमत आपल्याकडे आहे. संकटांवर धैर्याने मात करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे, असा विश्वास राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. पवार पुढे म्हणाले, “उद्याचा महाराष्ट्र दिन साजरा करताना या इतिहासाचे स्मरण करून कामाला लागू या, यश नक्कीच मिळेल,” असा आत्मविश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी आज (३० एप्रिल) फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना म्हणाले.

देशासह ओढवलेल्या कोरोना संकटामुळे लॉकडाऊन सारखे पाऊल उचलावे लागेल आहे. या लॉकडाऊमुळे गेल्या ४० दिवस देशातील कारखाने, व्यापार, उद्योगधंदे पूर्णपणे ठप्प आहेत. यामुळे देशातील आर्थिक व्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. राज्य सरकारला आर्थव्यवस्था ढासळळी आहे. राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटींची तूट होईल, असे दिसून येत आहे. यामुळे राज्यातील एकूण महसूलाच्या ४० टक्के तूट होणार, असे दिसून येता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्याला आर्थिक मदत हवी, अशी कल्पना दिल्याचे पवारांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला सांगितले.

राज्यावर आलेल्या संकटांचा आठवणींना दिला उजाळा

‘महाराष्ट्राने अशा प्रकारची संकट याआधीही पाहिली आहेत. आणि या संकटावर मात करण्याची हिंमत आपल्याकडे आहे. लातूरच्या भूकंपाच्या वेळीही असेच संकट होते. एक लाख घरे पडली होती. ८ हजार लोक मृत्युमुखी पडले होते. पण दोन वर्षांपेक्षाही कमी काळात आपण सर्व घरे पुन्हा बांधली. संकटग्रस्तांना मदत केली. मर्यादित कालावधीत आपत्तीनिवारण कसे केले जाते? शासकीय यंत्रणा कशी काम करते हे पाहण्यासाठी जागतिक बँक व युनोचे लोक त्यावेळी महाराष्ट्रात आले होते. आपत्ती व्यवस्थापनाचे अनुभव सांगण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून मला निमंत्रणही देण्यात आले होते,’ शरद पवारांनी जुन्या आठवणी सांगत जनतेमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही कमी

News Desk

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज

News Desk

राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार !

News Desk