HW News Marathi
महाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक

नवी दिल्ली – ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावर झालेल्या परेडमध्ये यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्राच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक’ सोहळा दाखवण्यात आला होता. केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सिताराम यांच्या हस्ते महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचे प्रथम पारितोषिक देण्यात आले. या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली होती.

महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती. त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून, त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले होते. या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेत्री ऑक्सिजन दाखवले. दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले होते. चित्ररथाच्या मागील भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या होत्या.

१९९२मध्ये ही महाराष्ट्राने ‘शिवराज्याभिषेक’ सोहळा दाखविणारा चित्ररथ साकारण्यात आला होता. तेव्हा ही त्याला प्रथम क्रमांक मिळाला होता. २०१५मध्ये महाराष्ट्राने ‘पंढरीची वारी’ या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता. तसेच १९९२ ते १९९५ या तिन्ही वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावून हॉट्रीक केली होती. यंदाच्या परेडमध्ये देशातील १४ राज्यांसह ७ केंद्र सरकारच्या खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे २ चित्ररथ असे एकूण २३ चित्ररथ राजपथावरील परेडमध्ये सामील झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारने इंपिरिकल डेटा न दिल्याने महाराष्ट्रासोबत देशातील अन्य राज्यांमधील ओबीसींचे आरक्षण अडचणीत! – छगन भुजबळ

Aprna

लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु आहे, कंगणाचे मुंबईतून निघतानाचे ट्विट

News Desk

“बेळगाव झांकी आहे, पण मुंबई अभी बाकी है”, चंद्रकांत पाटलांचा सेनेला टोला!

News Desk