शिर्डी। साईबाबांचे जन्मस्थळच्या वादावरून शिर्डी शनिवारी (१८जानेवारी) मध्यरात्रीपासून सुरू असलेला बेमुदत बंदला पुकारला होता. या बंदाच्या काळात साईबाबा मंदिर भक्तांनसाठी खुले होते. मात्र, दुकाने, बाजार मात्र बंद होती. या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी होणार होते. शिर्डीमधील कडकडीत बंदीमुळे काल (१९ जानेवारी) साई भक्तांचे हाल झाले. साई जन्मस्थळच्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२० जानेवारी) बैठक बोलावली आहे. यावर तोडगा निघेपर्यंत बंद मागे घेण्याचे मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतर शिर्डीच्या ग्रामस्थांनी बंद मागे घेतला आहे.
Maharashtra: Locals of Shirdi call off bandh tomorrow. A bandh was called today in #Shirdi town, against Chief Minister Uddhav Thackeray's reported comment calling Pathri, (in Parbhani) Sai Baba's birthplace.
— ANI (@ANI) January 19, 2020
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी आणि शिर्डीच्या नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्याप्रमाणे मी देखील कोणाच्या भावना न दुखवता चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (१९ जानेवारी) माध्यमांशी बोलताना केले आहे.
साईबाबांच्या जन्मस्थळावरून राजकारण करून नका । भुजबळ
साईबाबांच्या जन्मस्थळावरून राजकारण करून नका, असा सल्ला माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. भुजबळ पुढे म्हणाले की, पाथरी आणि शिर्डी या दोन्ही बाजू ऐकून मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतली, असे ते यावेळी माध्यमांशी बोलाताना म्हणाले. छगन भुजबळ म्हणाले की, शिर्डी बंद करून वाद संपणार नाही. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून वाद मिटविण्याचा सल्लाही त्यांनी शिर्डीच्या ग्रामस्तांना दिला आहे. पाथरी आणि शिर्डीकरांनी शांताने चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी शिर्डीत काल (१९ जानेवारी) दर्शनासाठी गेल्यानंतर पत्रकार परिषदेत केले आहे.
मुख्यमंत्री साईबाबांच्या जन्मस्थळबाबत नेमके काय म्हणाले
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका सभेत पाथरी साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत १०० कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर ठिणगी पडली. पाथरी गावाच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, जन्मस्थळाला विरोध असल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डीकरांनी बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री साईबाबा यांच्या जन्मस्थळ यावर भूमिका मांडत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.