HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus | राज्यातील १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द, शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई | राज्यात कोरोना व्हायरसचा वाढलेला संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून राज्याच्या शिक्षण विभागानेही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शिक्षण विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १ ली ते ८ वी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे, ९ वी आणि ११ च्या उर्वरित परीक्षा या येत्या १५ एप्रिलनंतर घेण्याचा निर्णय देखील शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयाबद्दल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (२० मार्च) थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्याचसोबत, दहावीचे शिक्षण वगळून इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गाला ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचा निर्णयही यावेळी वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला.

राज्यातील ही ४ शहरे आज मध्यरात्रीपासून येत्या ३१ मार्चपर्यंत बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील थोड्याच वेळापूर्वी कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर ही चार शहरे आज मध्य रात्रीपासून येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. यात, बंदमध्ये सध्यातरी मुंबईतील लोकल आणि बस सेवेचा समावेश नसेल. या बंददरम्यान अन्नधान, दूध, मेडिकल यासारख्या जीवनावश्यक वगळता सर्व कार्यालये आणि दुकाने बंद ठेवण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज (२० मार्च) व्हर्च्युअल पत्रकार परिषेदतून हे महत्वाचे निर्णय जाहीर केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप हा उन्मादी पक्ष, जयसिंगराव गायकवाडांचा गंभीर आरोप

News Desk

औरंगाबादमध्ये २ नवे कोरोना पॉझिटिव्ह, शहराची संख्या २० वर

News Desk

सीमावासियांच्या पाठिशी एकत्रितपणे उभे राहिले पाहिजे! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna